महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Temple Robbery : मत्स्योदरी मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना 24 तासाच्या आत अटक

जालना जिल्ह्यातील अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना 21 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेतील तीन चोरट्यांना जालना पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. तसेच दानपेटीतील 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

By

Published : Jul 23, 2023, 4:35 PM IST

Matsyodari Temple Thief
चोरट्यांच्या 24 तासाच्या आत अटक

मंदिरातील चोरीच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक

जालना: मत्स्योदरी देवी मंदिरातील चोरी संदर्भात विधानसभेतही आवाज उठविण्यात आला होता. या चोरीच्या घटनेमुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने संपूर्ण पोलीस यंत्रणेला सतर्क करून कामाला लावले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने सूत्रे हलवून विविध पथके तैनात केली होती. याप्रकरणी 21 जुलै 2023 रोजी श्री मत्स्योदरी देवी संस्थानाचे व्यवस्थापक कैलास रखमाजी शिंदे यांच्या तक्रार अर्जानुसार अज्ञात चोरट्यांनी दानपेटीचा पत्रा कापून त्यातील अंदाजे 60 हजार रुपये नगदी चोरून नेल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता.

लोकप्रतिनिधींचे पोलीस अधीक्षकांना निवेदन:मत्स्योदरी देवी हे जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व हिंदू संघटनांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी/ अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. पथकातील अधिकारी/ अंमलदार हे गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होते; परंतु मंदिर परिसरातील CCTV कॅमेरे बंद असल्याने तसेच कोणताही तांत्रिक पुरावा नसल्याने आरोपींचे निष्पन्न करणे जिकरीचे झाले होते.

या आरोपींना अटक:चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा हा आरोपी शिवाजी सुभाष बरडे (रा. काजळा, ता. बदनापूर, जि. जालना) याने त्याच्या इतर साथीदारांसह मिळून गुन्हा केला. यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी अशोक विठ्ठल भोसले (वय 27 वर्षे, रा. काजळा ता. बदनापूर जि. जालना), गणेश विश्वनाथ गायकवाड (वय 40 वर्षे, रा. काजळा जि. जालना) व इतर दोन अशा पाच जणांनी मिळून मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर इतर दोन आरोपींना काजळा येथून वेगवेगळ्या ठिकाणांहून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दानपेटीतून चोरलेली एकूण रक्कम 43,415/- रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना मुद्देमालासह अंबड पोलिसांकडे सोपविण्यात आले. घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम हे करीत आहेत. गुन्ह्यातील इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालू आहे.



'या' पोलीस पथकाने केली कारवाई:ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, विनोद गदधे, कृष्णा तंगे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, दत्तात्रय वाघुडे, सागर बावस्कर, सचिन चौधरी, विजय डिक्कर, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजणे, किशोर पुंगळे, रवि जाधव, भागवत खरात, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाणे, धिरज भोसले, चंद्रकला शडमल्लु, चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime News: 'त्या' दोन सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांकडून ड्रोनचे साहित्य जप्त; संवेदनशील ठिकाणी स्फोट करण्याचा होता डाव
  2. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर
  3. PMK leader murder case : थिरुपुवनम रामलिंगमच्या हत्येप्रकरणी एनआयए अॅक्शन मोडमध्ये... तमिळनाडूमधील 24 ठिकाणी टाकले छापे

ABOUT THE AUTHOR

...view details