महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या'आदेशामुळे क्रेडाईच्या मेहनतीवर पाणी: टनेल बनले शोभेची वस्तू - टनेल बनले शोभेची वस्तू

कोरोनापासून बचाव होण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी लोकांना सॅनिटाईज करण्यासाठी टनेल बसवण्याचा निर्णय झाला होता. क्रेडाईच्या मार्फत हे टनेल बसवण्याची तयारी जालना जिल्हाधिकारी कार्यलयात झाली. मात्र, आरोग्य विभागाने या योजनेला खो दिला आहे.

CREDAI make a tunnel
टनेल बनले शोभेची वस्तू

By

Published : Apr 21, 2020, 5:40 PM IST

जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी टनेल किंवा डोमद्वारे व्यक्तींच्या अंगावर सॅनीटायझर किंवा रासायनिक द्रवाची फवारणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जालन्यात असलेल्या क्रेडाई या संस्थेने चार ठिकाणी असे टनेल बसविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार पहिले टनेल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रवेशद्वारात बसविण्यात आले. याची पाहणीदेखील जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केली. पाहणीनंतर लगेचच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय पुणे येथून आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिनांक 19 एप्रिलला जारी केलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यामुळे हे टनेल सध्या शोभेची वस्तू झाली आहे.

टनेल बनले शोभेची वस्तू

क्रेडाईने सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेऊन शहरांमध्ये , पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका कार्यालय आणि सामान्य रुग्णालय अशा चार ठिकाणी आणि हे बसविण्याचे ठरविले होते. त्यापैकी पहिले टनेल हे जिल्हाधिकारी कार्यालयात बसविले आहे. मात्र सध्या ते शोभेची वस्तू झाली आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांना विचारले असता, सध्या त्यामधून कुठलेही रासायनिक फवारणी न होता फक्त पाणी सोडलेले असल्याचे सांगितले. दरम्यान क्रेडाईचे सचिव अविनाश भोसले यांनी सांगितले की, जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही चार ठिकाणी बसविण्याची तयारी केली होती. एक टनेल बसवले होते. उर्वरित तीन टनेल तयारही आहेत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील टनेल बसविण्यासाठी तुर्तास थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही आता ते बसविणार नाहीत.

असा आहे 19 एप्रिल 2020 चा आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांचा आदेश

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सध्याच्या कोविड 19 च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम/ टनेलचा वापर होत आहे, असे दिसून येत आहे. याद्वारे करण्यात येणाऱ्या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. अनेकदा ही रसायने व्यक्तीला अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे अशा रसायनांची फवारणी करणारी टनेल किंवा डोम किंवा त्या सदृश यंत्रणांचा वापर करण्यात येऊ नये. आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या सहीने हे आदेश जारी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details