कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या पतीचा अहवाल 'निगेटिव्ह' - जालना कोरोना रुग्ण
कोरोनाग्रस्त महिला जालन्यात ज्या भागात राहत होती, त्या गुंडेवाडी परिसरातील एका तेलबियांच्या कारखान्यातील तिच्या पतीसह अन्य 14 जणांना काल (शुक्रवारी) शासकीय रुग्णालयात भरती केले. त्यानंतर तपासणीसाठी त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते.
जालना - पतीसोबत भांडण करून गुजरातमध्ये गेलेल्या पत्नीला कोरोना झाल्याचा अहवाल 15 एप्रिलला गुजरात प्रशासनाला मिळाला होता. त्या अनुषंगाने ही महिला जालन्यात ज्या भागात राहत होती त्या गुंडेवाडी परिसरातील एका तेलबियांच्या कारखान्यातील तिच्या पतीसह अन्य 14 जणांना काल (शुक्रवारी) शासकीय रुग्णालयात भरती केले. त्यानंतर तपासणीसाठी त्यांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. या सर्व संभाव्य रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
संबंधित महिला 10 एप्रिल रोजी पतीसोबत भांडण करून गुजरात राज्यात असलेल्या मूळगावी आपल्या पाच वर्षांच्या मुलासह गेली होती. तिच्या संपर्कातील असलेल्या कारखान्यातील इतर लोकांना आणि या महिलेच्या पतीला कोरोना नसल्याचा अहवाल आला. या महिलेला जालना गुजरात राज्यातील नर्मदा या गावात जाण्यासाठी मिळालेल्या साधनांमधून कोरोनाची लागण झाली असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याचा जरी ताण कमी झाला असला तरी नर्मदा जिल्ह्यातील प्रशासनाचा ताण वाढलेला आहे.