जालना - तालुक्यातील मालखेडा येथे एका प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे याच्यासोबत लग्न ठरले होते. (१६ मे. रविवार) रोजी हे लग्न ठरले होते. १५ मे रोजी मुलीचा हळदीचा कार्यक्रम झाला होता. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशीच ही मुलगी आणि तिच्या मामाचा मुलगा नवनाथ सुरेश गायकवाड (वय 21, रा. मालखेडा) याने घळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. तसेच, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजाराम तडवी करत आहेत.
प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या - प्रेमीयुगुलाची आत्महत्या
आपण देघांनी एकत्र राहण्याचे ठरवले आहे. या नंतर तू दुसऱ्यासोबत लग्न कस करू शकते? आपण अस एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे म्हणत प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नवनाथ गायकवाड