महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना वनविभागाचे मॅनेज 'ई-टेंडरिंग' घालतय भ्रष्टाचाराला खतपाणी

लाखो रुपयांची उलाढाल होऊनही जालन्यात प्रत्यक्ष काम काहीच दिसत नाही. मात्र, ही उलाढाल कशा पद्धतीने केली जाते, हे आत्ता ई-टेंडरिंगच्या माध्यमातून समोर आले आहे.

वनविभागाचे मॅनेज 'ई-टेंडरिंग' घालतय भ्रष्टाचाराला खतपाणी

By

Published : Sep 5, 2019, 7:42 PM IST

जालना- येथील वन विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेमध्ये असतो. शासनाचे लाखो रुपये घेऊन देखील जालना जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाली नाही. उलट जुनेच खड्डे दाखवणे, झाडे लावल्याचा बनाव करणे आणि पाण्याअभावी ती जळून जातात त्यामुळे वन विभाग काय करेल? असे बहाणे सांगणे नेहमीचेच आहे. या सर्व प्रकाराला विभागीय वनाधिकारी पी.व्ही जगत यांनी देखील दुजोरा दिला आहे.

हेही वाचा-शासनाच्या अध्यादेशाविरोधात समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

विभागीय वनाधिकारी जगत यांच्या वतीने एका विभागीय दैनिकात दिनांक 1 सप्टेंबर रोजी ई-निविदा सूचना जाहीर झाली आहे. दोन वेगवेगळ्या जाहिरातींपैकी पहिल्या जाहिरातीमध्ये जालना जिल्ह्यातील विविध प्रस्तावित रोपांसाठी जैविक पदार्थ, जसे धानाचा भुसा, कोकोपीट, ज्वारी, लाकडी भुसा, दिनांक 5 सप्टेंबर 2019 ते 15 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी पुरवठा करण्यासाठी अधिकृत परवाना धारकांकडून ई-निविदा मागविली आहे. ही निविदा संकेतस्थळावर दिनांक 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. तसेच ही निविदा भरण्याची अंतिम तारीख ही 3 सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत देण्यात आली आहे. अनुक्रमांक 3 मधील सूचनेनुसार निविदा धारकाने त्यांच्या निविदा दिनांक 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत ई-टेंडरिंग पद्धतीने सादर कराव्यात सदर निविदा दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येतील, असे नमूद केले आहे.

वनविभागाचे मॅनेज 'ई-टेंडरिंग' घालतय भ्रष्टाचाराला खतपाणी

हेही वाचा-जालना: व्याजाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून

अशाच प्रकारच्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये जिल्ह्यातील प्रस्तावित रोपवन यासाठी शुष्क कंपोस्ट खत दिनांक 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान पुरवठा करण्यासंदर्भात ही निविदा आहे. ही निविदा देखील दिनांक 26 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत भरता येणार असून 4 तारखेला दुपारी 2 वाजता उघडण्यात येईल, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात 26 तारखेपासून सुरू झालेल्या या निविदा दिनांक 1 सप्टेंबरला वृत्तपत्रात देण्यात आली आहे. आणि 1 दिवस मुदतीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी ती बंद करण्यात आली आहे. खरे तर ही निविदा 26 तारखेपूर्वीच प्रसिद्ध करायला हवी होती. मात्र, तसे न करता उशिरा 1 सप्टेंबरला प्रकाशित केली. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या परिचित व्यक्तीशिवाय गुत्तेदार याशिवाय ही निविदा कोणालाही भरता येऊ नये, किंवा तशी तयारी करता येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

26 तारखेपासून सुरू झालेल्या निविदेची जाहिरात तब्बल 5 दिवसानंतर वृत्तपत्रात दिल्यामुळे तिची कुठेही चर्चा झाली नाही. ती कोणी भरायची ठरवली तरी देखील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून जातो. मात्र, अधिकाऱ्यांशी हितसंबंध असलेले गुत्तेदार ही निविदा भरतात. या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला जातो.

त्यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात गैर कारभार चालतो. अनेक कामे मर्जीतल्या गुत्तेदाराला देऊन कागदोपत्री दाखवून बिलं उचलली जातात. त्यामुळे नवीन गुत्तेदाराला काम मिळत नाही आणि अशाच प्रकारातून मागील आठवड्यात या विभागाच्या वनाधिकाऱ्याला खंडणी मागण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details