बदनापूर (जालना) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान सर्वत्र फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. बदनापूर तालुक्यात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 3 तास आणि सायंकाळी 2 तास उघडी ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, या आदेशानंतरही अत्यावश्यक कारणाशिवाय अनेक लोक रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांविरोधात कडक भूमिका घेतली असून आज सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. भागवत यांनी थेट रस्त्यावर उतरून 25 दुचाकी जप्त केल्या.
बदनापूरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई; 25 दुचाकी जप्त - पोलिसांची कारवाई
बदनापूर तालुक्यात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 3 तास आणि सायंकाळी 2 तास उघडी ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, या आदेशानंतरही अत्यावश्यक कारणाशिवाय अनेक लोक रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती; स्वस्तात होणार उपलब्ध
बदनापूर पोलिसांनी रस्त्यावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी बदनापूर येथील किराणा, भाजीपाला यांसारखी दुकाने सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 खुली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी नागरिकांना कारण विचारले असता, अनेकवेळा किराणा, भाजीपाला अथवा मेडीकल अशी कारणे मिळतात. मात्र वास्तवात तसे कोणतेही काम असत नाही. आज सोमवारी बदनापूर येथे पोलीस निरीक्षक एस. बी. भागवत यांनी थेट रस्त्यावर उतरून या दुचाकी चालकांवर कारवाई केली. या वेळी कोणतेही रास्त कारण नसताना रस्त्यावर आल्याचे निदर्शनास आल्यामुळे 25 दुचाकी जप्त केल्या असून त्या दुचाकी पोलीस ठाण्यात आणून ठेवल्या आहेत.