जालना- जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यानुसार आरोग्य प्रशासन तयारीला लागले आहे. जालना जिल्ह्यात येणारी लस किती असणार? कुठे साठवणार? कोणाला देणार? याविषयी आता उत्सुकता वाढली आहे.
प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीला सकाळीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत लस जालन्यात पोहोचलेली नाही. ती कधी पोहोचणार? कशी पोहोचणार? याविषयी देखील प्रशासनाला सूचना आलेल्या नाहीत. मात्र, आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. आलेली लस ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामधील शीतगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.