जालना- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. शासनाच्या निर्देशानुसार परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी आणि आवश्यकतेनुसार विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. सर्व नागरिकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी जालना सामान्य रुग्णालयात करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.
जालन्यात विलगीकरण कक्षातील कोरोना संभाव्य रुग्णाची प्रकृती गंभीर - कोरोना संभाव्य रुग्णाची प्रकृती गंभीर
आतापर्यंत एकूण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 111 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 3 नमुने रिजेक्ट झाले आहेत, 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी 43 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले. यातील 42 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोना विषाणू संबंधित सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद, पंचायत यांची आढावा बैठक घेतली आहे. जिल्ह्यामध्ये 4 एप्रिलला 21 रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 111 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 3 नमुने रिजेक्ट झाले आहेत, 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी 43 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले. यातील 42 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत.
सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकूण 122 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 115 व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.