महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्यामध्ये आढळला कोरोनाचा पहिला संशयित - corona positive maharashtra

संशयित रुग्णाला जालन्याच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली आहे.

corona suspected
जालना जिल्ह्यामध्ये आढळला कोरोनाचा पहिला संशयित

By

Published : Mar 12, 2020, 10:42 PM IST

जालना - कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला संशयित रुग्ण गुरुवारी सामान्य रुग्णालयात दाखला झाला आहे. रुग्णाला सर्दी, खोकला, ताप ही लक्षण आहेत. संबंधित रुग्ण हा मुंबई पोलीस विभागात कार्यरत असून मागील आठ दिवसांपासून त्याने पोलीस रुग्णालय, नायगाव दादर याठिकाणी उपचार घेतलेला आहे. या रुग्णाचा थुंकी नमुना घेण्यात आला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यामध्ये आढळला कोरोनाचा पहिला संशयित

हेही वाचा -भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 73 वर

रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली आहे.

नागरिकांनी घाबरु नये, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोरोना विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. बाहेरून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर हात, रूमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. त्यानंतर टिश्यू पेपरची व्यवस्थितपणे बंद कचराकुंडीत विल्हेवाट लावावी. शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे. पूर्ण शिजविलेले खाद्यपदार्थ खावे.

अर्धवट शिजविलेले खाद्यपदार्थ खावू नये. ताप, खोकला आल्यास डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळाटाळ करू नये. कुठल्याही वस्तूच्या पृष्ठभागावरून लागलीच हात तोंडाला लावू नये. कुठेही थुंकू नये, नागरिकांनी घाबरून जावू नये. पाळीव प्राण्यांना अस्वच्छ ठेवू नये. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details