महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : तयार केलेल्या मूर्तींची बुकींग होत नसल्याने गणेश मूर्तिकार आर्थिक संकटात - गणेश मूर्तिकार न्यूज

लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगाराची चिंता असताना आता बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांची चिंता वाढलेली आहे. बदनापूर येथील औरंगाबाद-जालना रस्त्यावर असलेल्या मूर्तिकारांनी दुकाने थाटून वर्षभर मेहनत घेऊन मूर्ती घडवल्या असल्या तरी अद्याप एकही बुकिंग नसल्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

corona impact on Ganesh idol makers in jalna
तयार केलेल्या मुर्तींची बुकींग होत नसल्याने गणेश मूर्तिकार आर्थिक संकटात

By

Published : Aug 6, 2020, 7:46 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगाराची चिंता असताना आता बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांची देखील चिंता वाढलेली आहे. बदनापूर येथील औरंगाबाद-जालना हमरस्त्यावर असलेल्या मूर्तीकारांनी दुकाने थाटून वर्षभर मेहनत घेऊन मूर्ती घडवल्या असल्या तरी अद्याप एकही बुकिंग नसल्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद-जालना हमरस्त्यावर कृषी संशोधन केंद्रासमोर तसेच सेवानगर तांडा परिसरात मूर्तीकारांची घरे आहेत. या ठिकाणी हे मूर्तीकार वर्षभर मेहनत घेऊन मोठ्या तसेच घरगुती वापरासाठीच्या गणेश मूर्ती घडवतात. त्यांना रंगकाम करून आकर्षकरित्या सजवतात. या मूर्तींना तालुकाभरातून मोठी मागणी असते. प्रत्येकवर्षी दोन ते तीन महिने आधीपासून मूर्तींची बुकिंग करण्यात येते. या मूर्तीच्या व्यवसायावरच यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे या मूर्तीकारांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्ती घडवलेल्याच नाहीत. घरगुती वापरासाठीच्या आकर्षक मूर्ती बनवून विक्रीसाठी उपलब्ध असताना अद्याप बुकिंग झाली नसल्यामुळे, यंदा कसे होणार याबाबत मूर्तीकारात चलबिचल आहे.

तयार केलेल्या मुर्तींची बुकींग होत नसल्याने गणेश मूर्तिकार आर्थिक संकटात
बदनापूर येथील मूर्तीकार बाबूलाल गुलाबराव पेंढारकर, सचिन बाबूलाल पेंढारकर, संदीप पेंढारकर, अक्षय पेंढारकर, अजय पेंढारकर हे मूर्तीकार याठिकाणी मूर्ती घडवण्याचे काम करतात. त्यांना त्यांची आई दुर्गाबाई बाबूलाल पेंढारकर या ही रंगकाम व आकर्षक मूर्ती घडवण्यासाठी मदत करत असतात. या कुटुंबीयांची ही तिसरी पिढी गणेश मूर्ती घडवण्याचे काम करत असते. वर्षभर साच्याद्वारे मूर्ती घडवून यांत्रिकी पध्दतीने रंगकाम करून या मूर्ती अधिकाधिक आकर्षक करण्याकडे यांचा भर असतो. पेंढारकर कुटुंबीयांनी बनवलेल्या मूर्तींना मोठी मागणीही तालुक्यासह जालना जिल्ह्यातून असते. त्यांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवल्या असल्यातरी यंदा मात्र मागणी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तयार केलेल्या मुर्तींची बुकींग होत नसल्याने गणेश मूर्तिकार आर्थिक संकटात
याबाबत सचिन पेंढारकर यांने सांगितले की, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी १० वर्षांपूर्वी एक याचिका निकाली काढली. या याचिकेवर सुनावणी करताना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर महाराष्ट्र राज्य सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी. अशा मूर्ती तयार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच मूर्तीकार संकटात सापडलेले होते. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वर्षासाठी पीओपी मूर्तींना सूट दिलेली असल्यामुळे आम्ही थोडेसे सुखावल्याचे मुर्तीकरांनी सांगितले. मात्र, कोरोनामुळे विक्रीच नसल्याचे चित्र असल्यामुळे चिंता वाढली आहे. याबाबत दुर्गाबाई पेंढारकर यांनीही खंत व्यक्त केली आहे. तिन पिढयांपासून आमचा हा व्यवसाय असून पहिल्यांदाच आर्थिक संकटाला मूर्तीकारांना तोंड द्यावी लागत असल्याची खंत व्यक्त करून शासन दरबारी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details