जालना- जालना औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना कामगार पुरवणाऱ्या ठेकेदाराची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. संजय अंभोरे (वय 43 वर्षे, रा. बदनापूर, ता. शेलगाव) असे त्या ठेकेदाराचे नाव आहे. ही घटना औरंगाबाद रोडवरील शेलगावनजीक पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घटली आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर चंदनझिरा परिसरात हल्ला झाला होता.
हेही वाचा - जालन्यात ५ मतदारसंघातून ५४ जणांची माघार, ७९ उमेदवार रिंगणात
दरम्यान, काही दिवसापूर्वी संजय अंभोरे यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन आपल्या जीवितास धोका असून, आरोपींकडे गावठी पिस्तूल असल्याची तक्रार केली होती. आज सायंकाळी पावणे आठच्या सुमारास संजय अंभोरे हे शेलगावजवळच असलेल्या राजपूतवाडी गावाजवळून त्यांच्या कारमधून (क्र. एम एच 21 ए जे 4141) जात असताना त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी अडविले. त्यानंतर त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून पाठीमघून डोक्यात आणि एक छातीत अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी असलेल्या अंभोरे यांना तातडीने जालन्याच्या दीपक हॉस्पिटलमध्ये दाखले केले होते. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्याले होते. मात्र ,गोळीबाराची उत्तरीय तपासणी या रुग्णालयात होत नसल्याने पुढील प्रक्रियेसाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - जालन्यातील भागडे सावरगाव शिवारात अंगावर वीज पडून तीन ठार तर दोन जखमी