महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण - जालना राजकीय घडामोडी

तीन पक्षांच्या आघाडीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या पक्षांमध्ये नुराची कुस्ती सुरू आहे, असे वक्तव्य केले होते. याला आज शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमच्यामध्ये कुठलीही कुस्ती सुरू नाही. त्यामुळे हे सरकार ठरलेला कालावधी सक्षमपणे पूर्ण करील.

जालना
जालना

By

Published : Jan 2, 2021, 10:27 PM IST

जालना- आम्हाला नुरासोबत कुस्ती खेळण्याची गरज नाही, आमच्यात मुली कुस्ती असते, तसेच आमच्यात कुठलीही कुस्ती सुरू नाही. कुस्ती खेळायची असेल तर भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमसोबत खेळू, असे प्रत्युत्तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

जालना

तीन पक्षांच्या आघाडीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या पक्षांमध्ये नुराची कुस्ती सुरू आहे, असे वक्तव्य केले होते. याला आज शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमच्यामध्ये कुठलीही कुस्ती सुरू नाही. त्यामुळे हे सरकार ठरलेला कालावधी सक्षमपणे पूर्ण करील. कुस्ती खेळायची असेल तर आम्ही भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमसोबत खेळू.

अर्थसंकल्पाची तयारी

मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे, त्यानिमित्त आज मराठवाड्याचा दौरा करत आहे. त्यानिमित्ताने कुठली कामे बाकी आहेत, कुठली घ्यायची आहेत, हेदेखील पाहणी करण्यासाठी आजचा हा दौरा आहे. मागील दौऱ्याच्या वेळी अनेक कामे मार्गी लागली आहेत. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे या कामांविषयी जास्त बोलता येणार नसल्याचेही मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मेटेंनी ती क्लिप पहावी

आमदार विनायक मेटे आठ दिवसांपूर्वीच मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मराठा समाजात भांडणे लावतात यांसह विविध आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करताना अशोक चव्हाण म्हणाले, की मेटेंनी केलेल्या आरोपांना, प्रत्यक प्रश्नाला मी उत्तर दिले पाहिजे, असे बंधन नाही. खरे तर मेटेंनीच अभ्यास करायला हवा. कारण देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाची क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाची लढाई फक्त न्यायालयात सुटू शकते, असे म्हटले आहे. त्यामुळे ही क्लिप देखील मेटेंनी पहावी, असा सल्लाही मंत्री अशोक चव्हाण यांनी मेटे यांना दिला.

संभाजीनगर की औरंगाबाद

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि आता या शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या तयारीत शिवसेना आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की की, हा स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. आम्ही जरी तीन पक्षाचे नेते राज्यात काम करत असलो तरी हा विषय आमच्यात आलेला नाही, आमचा नाही. त्यामुळे या प्रश्नात आम्ही लक्ष घालणार नाही. सहाजिकच तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र काम करीत असल्यामुळे प्रत्येकाला आपापले विचार असू शकतात. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्याने याबद्दल वक्तव्य केलेले नाही.

आता केंद्राला देखील बाजू मांडावी लागेल

मराठा आरक्षणासंदर्भात आता सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने देखील देशाच्या अ‌ॅटर्नी जनरल यांना नोटीस काढलेली आहे. त्यामुळे आता केंद्राला देखील न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे. ही न्यायालयीन लढाई पूर्ण करावी लागणार आहे.

औरंगाबादहून नांदेडकडे जाताना शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जालन्याचे शहराध्यक्ष शेख महेमूद, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया आदींची यावेळी उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details