महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसकडून रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध; 'भारत बंद'ला जालन्यात संमिश्र प्रतिसाद - भारत बंदला पाठिंबा जालना

जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मामा चौकातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान मोदी सरकारच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.

जालना
जालना

By

Published : Dec 8, 2020, 8:38 PM IST

जालना- गेल्या 12 दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज जालना बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला जालनेकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपले सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत सुरू केले.

जालना

जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मामा चौकातून काँग्रेस पक्षाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान मोदी सरकारच्या विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, रस्त्यामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यालाही या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केले. या रॅलीमध्ये कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख मेहमूद, भीमराव डोंगरे, विजय कामड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संमिश्र प्रतिसाद

सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मामा चौकात हुतात्मा जनार्दन मामा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही रॅली पुढे निघाली. त्यानंतर याच परिसरात असलेल्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आणि बारा वाजेच्या सुमारास ५० टक्के दुकाने उघडी झाली. शहरातीलच आणखी एक मोठी बाजारपेठ म्हणजे जिंदाल मार्केट, या जिंदाल मार्केटमध्ये देखील बारा वाजेच्या सुमारास मोठमोठी दुकाने उघडण्यास सुरुवात झाली.

वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा

भारत बंदला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मामा चौकांमध्ये रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून मोदी सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याचा निषेध करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details