जालना - काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे अटक करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने आज (रविवारी) गांधी चमन येथे निषेध नोंदवून घोषणाबाजी केली.
प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने जालन्यात निदर्शने - Priyanka Gandhi
प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी अटक केल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने जालन्यात निदर्शने केली.
सोनभद्र येथे १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी गेल्या होत्या. मात्र, त्यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी भेटण्यासाठी जाऊ दिले नाही. तसेच गैरमार्गाचा अवलंब करत त्यांना अटक केली, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून ही निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख आणि प्राध्यापक सत्संग मुंडे यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.