महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसने पाळला मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस - Jalna Latest

गेल्या सात वर्षांपासून देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने जुन्या जालन्यात 30 मे हा दिवस मोदी सरकारच्या स्थापना दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला.

काँग्रेसने पाळला मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस
काँग्रेसने पाळला मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस

By

Published : May 31, 2021, 9:59 AM IST

जालना - केंद्रात मोदी सरकारला सत्तेवर येऊन 30 मे ला सात वर्षे पूर्ण झाले, या सात वर्षाच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षाने 30 मे हा काळा दिवस म्हणून पाळला आहे. त्या निमित्त येथील गांधी चौकात निदर्शनेही करण्यात आले.

काँग्रेसने पाळला मोदी सरकारच्या विरोधात काळा दिवस

काळे झेंडे दाखवून निदर्शन

जुन्या जालन्यातील गांधीचमन परिसरात 30 मे हा मोदी सरकारच्या स्थापना दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. गेल्या सात वर्षांपासून देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचा भडका उडाला आहे. सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. मात्र याकडे मोदी सरकार लक्ष देत नाही, याचा निषेध म्हणून काल हे निदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख मेहमूद, प्राध्यापक सत्संग मुंडे, विजय कामड, दिनकर घेवंदे, राम सावंत, नीळकंठ वायाळ, बदर चाऊस, आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा -'...यामुळे काळी अन् पांढरी बुरशीसारखे आजार निर्माण झाले'

ABOUT THE AUTHOR

...view details