जालना - भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या औरंगाबादमधील बंगल्याचे थकीत वीज बिलाअभावी विजेचे मीटर इंजिनिअरने काढून नेले म्हणून त्यांना शिवीगाळ केली आहे. इंजिनिअर सोबत लोणीकरांच्या झालेल्या संभाषणात लोणीकर यांनी महावितरणमध्ये काम करणाऱ्या दलित कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली आहे. तसेच झोपडपट्टीतील लोकांच्या घरी जाऊन वीज कनेक्शन तोडा असे म्हटले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्यावर अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ( Congress leader Demands to a complaint filed on lonikar ) करावा, अशा आशयाची तक्रार जालना पोलिसांत काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
बबनराव लोणीकरांनीदिले होते स्पष्टीकरण -
भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर ( Bjp Mla Babanrao Lonikar ) यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदयांनी चक्क अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ( Babanrao Lonikar Viral Audio Clip ) होती. मात्र, त्यावर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले ( Babanrao Lonikar Viral Audio Clip Clarification ) आहे. औरंगाबादमध्ये माझा एक बंगला आहे. त्याचे बिल भरले असून वीज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकून मला बदनाम करत आहे. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.