जालना -कृषी कायद्यासह कामगार कायदा हा अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर आंदोलने केली जात आहेत. तर राजधानी दिल्ली येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जालन्यातून काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी जाणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.
शेतकर्यांच्या आंदोलनाला जालन्यातून पाठिंबा
दिल्लीमध्ये सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 4 डिसें.) धरणे आंदोलन करण्यात आले. गांधीचमन परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक तास हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच केंद्राने शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या कायद्याला विरोध करून तो रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यात काँग्रेसने हे धरणे आंदोलन केले असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.
हेही वाचा -जागतिक मृदा दिन: बदनापूरमध्ये शेतकरी मेळाव्यात कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हेही वाचा -जुन्या जालन्याचा पाणीपुरवठा लांबणार