महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक : 'ऑनलाइन' भरलेल्या उमेदवारी अर्जावरुन गोंधळ

जालना जिल्ह्यातील घाणेवपाडी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रं. 1 या वार्डातील एका महिला उमेदवाराचा अर्ज ऑनलाइन पात्र दाखवला. त्यानंतर तहसील कार्यालयातही बरोबर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिन्ह वाटपावेळी त्या महिलेचे नाव अपात्र उमेदवाराच्या यादीत आल्याने गोंधळ उडाला होता.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Jan 4, 2021, 10:10 PM IST

Updated : Jan 4, 2021, 10:46 PM IST

जालना -जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ऑनलाइन भरलेला अर्ज अगोदर पात्र आणि नंतर अपात्र ठरविल्यामुळे जालना तहसीलमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र, यावर आता काहीच तोडगा नसल्याने उमेदवार न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.

बोलताना सुरेश खंडाळे

कुठे पात्र तर अपात्र

जालना तालुक्यातील घाणेवाडी येथून वार्ड क्रमांक 1 हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. याच पदासाठी सरपंच पद आरक्षित आहे. त्यामुळे ओबीसी महिला उमेदवाराने आपला ऑनलाइन अर्ज भरला होता. त्यानंतर भरलेल्या अर्जाच्या प्रिंट काढून त्या जालना तहसील कार्यालयात दाखल केल्या. कर्मचाऱ्यांनी तपासून त्यांना बरोबर असल्याचेही सांगितले. मात्र, जेव्हा चिन्ह वाटपाची वेळ आली. त्यावेळी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी सुरेश खंडाळे यांनी मागितली. त्या यादीत या उमेदवाराचा अर्ज अपात्र असल्याचे सांगितले.

न्यायालयात जाणार

शेवटच्या क्षणी उमेदवार अपात्र असल्याचे सांगितल्यामुळे इथे बराच वेळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना हा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी आता यावेळी तहसील स्तरावर काहीच होऊ शकत नसल्याचे सांगितले. सर्व कागदपत्रे घेऊन न्यायालयात रितसर दाद मागा, असे सांगितल्याची माहिती सुरेश खंडाळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात

हेही वाचा -जालन्यात वीष पिऊन वृद्धाचा मृत्यू; पोलीस घेत आहेत नातेवाईकांचा शोध

Last Updated : Jan 4, 2021, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details