जालना- कोरोना हा संसर्गजन्य आजार असून तो कशामुळे होईल हे काही सांगता येत नाही. हातांच्या स्पर्शाने हा आजार जास्त पसरतो, असे गृहित धरले जात आहे. त्यामुळे, आता हस्तांदोलन तर सोडाच एक दुसर्याच्या ठशावर ठसे देखील उमटवणे धोकादायक ठरू शकते. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक जाहीर करत जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीमध्ये सूट दिली आहे.
जालन्यात कोरोनाचा धसका; बायोमेट्रिक हजेरीतून कर्मचाऱ्यांची सुटका - रवींद्र बिनवडे जिल्हाधिकारी
जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज १५ मार्च रोजी आपत्ती प्राधान्य म्हणून एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये ज्या कार्यालयात बायोमेट्रिक मशीन द्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्या जाते अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीपासून मुक्त करून पूर्वीप्रमाणेच रजिस्टरवर सह्या करण्याच्या सूचना केल्या आहेत.
२४ फेब्रुवारीला शासनाने अध्यादेश काढून कार्यालयीन कामकाजाची वेळ वाढवली होती. त्यामुळे, अनेक ठिकाणी बंद पडलेले बायोमेट्रिक मशीन पुन्हा सुरू करण्यात आले, तर काही कार्यालयांनी नवीन मशीन बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज १५ मार्च रोजी आपत्ती प्राधान्य म्हणून एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये ज्या कार्यालयात बायोमेट्रिक मशीन द्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी घेतल्या जाते अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीपासून मुक्त करून पूर्वीप्रमाणेच रजिस्टरवर सह्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत सदर परिपत्रकातील आदेश लागू राहील, असेही सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा-कर्जमाफी : शेतकऱ्यांनो घाबरू नका, बोटांचे ठसे नसतील तर 'या' उपायोजना करा