जालना -कोरोनाने जगभरात थैमान घातले असून देशभरात लॉकडाऊनमुळे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. याची जाणीव ठेवून भोकरदन शहरवासीयांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
संचलनादरम्यान भोकरदन पोलिसांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी - Bhokardan Police latest news
डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे संरक्षण करत आहेत. याची जाणीव ठेवून भोकरदन शहरवासीयांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. भोकरदन शहरामधून पोलीस प्रशासनाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.
भोकरदन पोलीस
भोकरदन शहरामधून पोलीस प्रशासनाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रत्येक घरातून फुलांचा वर्षाव करून या संचलनात सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. काही महिलांनी पोलिसांचे औक्षणही केले. या संचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.