जालना -शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सर्वच यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. आजपासून शहरांमध्ये सर्व्हे करून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. सर्व्हेमध्ये टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, ५६, ५७ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार कार्यशाला घेण्यात आली.
जालन्यात सोमवारपासून सर्व्हे, ज्येष्ठ नागरिकांची होणार तपासणी - जालना लेटेस्ट न्यूज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कडले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, साथरोग विभागाचे कर्मचारी महेंद्र वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती. आजपासून मतदार यादीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कडले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, साथरोग विभागाचे कर्मचारी महेंद्र वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती. आजपासून मतदार यादीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. याची आखणीही तयार करण्यात आली आहे. या आखणीनुसार पथकामध्ये संबंधित प्रभागाचा नगरसेवक, त्यांच्यासोबत एक वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, एक कर्मचारी, अंगणवाडीसेविका, एक अशा वर्कर, असे एकूण सहा जणांचे पथक असणार आहे. हे पथक शहरातील घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान आणि त्यांच्या आरोग्याची नोंद करणार आहे. या उपक्रमामुळे संशयित कोरोनाबाधित रुग्ण तपासल्या जाऊन त्यांच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने कोरोनाला आळा बसेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटत आहे. या कार्यशाळेला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आता जालना शहरातून कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.