महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यातील बदनापूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे. त्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्या आदेशानुसार देवकर्ण वाघ, संदीप ताडगे, संजय जऱ्हाड आदींसह बदनापूर तालुक्यातील २५ कार्यकर्ते आज बदनापूर तहसील कार्यालयात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांचा आत्मदहन करण्याचा बेत होता. मात्र पोलिसांनी तो बेत हाणून पाडला.

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

By

Published : Aug 26, 2019, 7:44 PM IST

जालना- संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी भारतीय छावा संघटनेची मागणी आहे. त्याअनुषंगाने अखिल भारतीय छावा संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय बदनापूर येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी साडेबारा वाजता हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र बदनापूर पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे. त्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्या आदेशानुसार देवकर्ण वाघ, संदीप ताडगे, संजय जऱ्हाड आदींसह बदनापूर तालुक्यातील २५ कार्यकर्ते आज बदनापूर तहसील कार्यालयात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांचा आत्मदहन करण्याचा बेत होता. मात्र अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदनापूर पोलीस आगोदरच तेथे सज्ज होते. यामध्ये पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, ए एस आय शेख इब्राहिम व इतर पोलीस कर्मचारी होते.

दुपारी १ वाजताच्या सुमारास आत्मदहनकर्ते तहसील कार्यालयात पोहोचले. त्याच्या हातात बिसलेरीच्या बाटल्या होत्या. या बाटल्यांमध्ये केरोसीन भरलेले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून बाटल्या हिसकावून घेण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे बाटलीतील रॉकेल पोलिसांसह आत्मदहन कर्त्यांच्या अंगावर पडले. शेवटी पोलिसांना कार्यकर्त्यांना पकडण्यात यश आले. त्यानंतर तहसीलदार वर्षा पवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आत्मदहनाचा प्रयत्न स्थगित करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details