महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट खरेदी करारनामा करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल - jalana police

बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावे प्लॉट खरेदी करारनामा करून, फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

jalana news
फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल

By

Published : Oct 24, 2020, 8:32 PM IST

जालना -बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावे प्लॉट खरेदी करारनामा करून, फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी शरद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील दत्तात्रेय धोंडीराज कुलकर्णी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वडिलांच्या मालकीची हसनाबाद शिवारात जमीन आहे. आरोपींनी ही जमीन वडिलांची खोटी स्वाक्षरी करून बळकवण्याचा प्रयत्न केला.

गजानन वनारसे, कृष्णा पवार, दत्तू मैद अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी खोटी स्वाक्षरी करून प्लॉट खरेदी करारनामा केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details