जालना - तिर्थपुरीत शेतमजूर महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन नराधमांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिर्थपुरी येथील एका 30 वर्षीय शेतमजूर महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार करून व्हिडीओ व्हायलर केला होता. ही घटना 11 डिसेंबरला सकाळी 10 च्यादरम्यान तिर्थपुरी शिवारात घडली होती. आरोपीने केलेले चीत्रीकरण परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले होते. यामुळे पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल - Jalna Latest News
जालना जिल्ह्यातील शेतमजूर महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना तिर्थपुरी शिवारीत घडली होती.
पोलीस प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बलात्कार करणारा आरोपी आणि मोबाईलवर व्हिडीओ चित्रित करणारा, अश्या दोन नराधामविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी सुधीर सूर्यवंशी, श्रीराम विश्वनाथ बनकर (दोघे रा. तिर्थपुरी) यांच्याविरुद्ध कलम 376, 506, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबडचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला असून, त्यांना तिर्थपुरी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे सहकार्य करत आहेत.