महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ - corona in jalna

जालना जिल्ह्यात जसा कोरोना रुग्णांचा आकडा वाढायला लागला आहे. तसा रुग्णालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

chaos-of-the-health-department-in-jalna-district-on-the-backdrop-of-the-corona
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ

By

Published : Feb 25, 2021, 7:14 PM IST

जालना - जिल्ह्यात जसा कोरोना रुग्णांचा आकडा वाढायला लागला आहे. तसा रुग्णालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे जालना जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

गोपनीयतेच्या नावाखाली आरोग्य विभाग पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची यादी जाहीर करत नाही. यामुळे अनेक रुग्णांना मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. दिनांक 21 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता जालन्यातील एका 46 वर्षीय महिलेने आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याची टेस्टिंग 22 तारखेला सायंकाळी पाच वाजता झाली. त्यानंतर अहवाल दिनांक 23 तारखेला सहा वाजता पॉझिटिव म्हणून आला.

हा अहवाल अन्य पॉझिटिव रुग्णांच्या सोबतच एकत्र आला आहे. मात्र याच सॅम्पल मधील याच वेळचा आणखी एक अहवाल निगेटिव्ह आल्याचे पत्र आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीची एकाच ठिकाणी एकाच वेळी घेतलेली टेस्ट एकदा निगेटिव्ह आणि एकदा पॉझिटिव्ह आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दुजोरा


जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी हा प्रकार झाल्याचे मान्य केले आहे. त्यांनी संबंधित जबाबदार व्यक्तीला नोटीसही बजावली आहे. तसेच तीन सदस्यांची एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले आहेत. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि अन्य एक डॉक्टर यांचा या समितीमध्ये समावेश आहे. मात्र अद्यापपर्यंत या समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही.

रुग्णांच्या जीवाशी खेळ-


कोरोना रुग्णालयामध्ये अशा प्रकारची अनेक गंभीर प्रकरणे दिसून येतात. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. सहा महिन्यापूर्वी कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये जिवंत अळ्या निघाल्या होत्या. आता तर या रुग्णांचा रिपोर्ट बदलला जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बाहेर मोकाट फिरण्याची शक्यता आहे. तसेच निगेटिव्ह असलेला रुग्ण पॉझिटिव्ह दाखविल्यामुळे कोरोनाच्या भीतीने त्याच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


रुग्णाच्या अहवालावर ऑपरेटरची सही-

रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेला अहवाल अतिमहत्त्वाचा आहे. त्यामुळे आरोग्य विभाग देखील या अहवालाला गोपनीय ठेवते. मात्र अशा या अतिमहत्त्वाच्या अहवालावर कोणताही जबाबदार डॉक्टर सही न करता एका साधारण ऑपरेटरच्या सहीने हा अहवाल दिला जातो. विशेष म्हणजे आता हा अहवाल देणाऱ्या ऑपरेटरवरच हे सर्व प्रकरण शेकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या डॉक्टरांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. यांची नावे उघड करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा-नीरव मोदीला झटका, भारतात लवकरच प्रत्यार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details