महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझं मंत्रीपद गेल्याच्या बातम्यांनी अनेकांना गुदगुल्या झाल्या.. पण माझा हनिमून आधीच झालाय- दानवे - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

मी आज संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या शहरातील बैठका घेतोय ती शहरे पाहतोय ते केवळ तुम्ही मला तुमच्या खांद्यावर घेतले आहे म्हणून शक्य आहे. त्याची मला जाणीव आहे ,अनेक आमदार येतात आणि जातात पण या जिल्ह्याच्या जनतेने सलग 35 वर्ष मला राजकारणात विजयी ठेवले. त्यामुळे मी आज केंद्रात मंत्री आहे, अन्यथा मी माझ्या माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो,

पण माझा हनिमून आधिच झालाय- दानवे
पण माझा हनिमून आधिच झालाय- दानवे

By

Published : Aug 20, 2021, 8:56 AM IST

Updated : Aug 20, 2021, 9:59 AM IST

जालना- राजकीय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात मात्र मी सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखेच वागतो. म्हणून सातत्याने ४० वर्ष एकही निवडणूक न हारता निवडून येत आहे, असे सांगताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत विजयी होण्या मागच्या कारणांचे स्पष्टीकरण केले. गुरुवारी भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालन्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा जालना जिल्हा भाजपच्या वतीनं सत्कार करण्यात आला, त्या समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनी जोरदार चिमटे काढले.

पण माझा हनिमून आधीच झालाय- दानवे

नाहीतर मी मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो-

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, निवडून आल्यानंतर अनेक नेत्यांच्या वागणुकीत आणि राहणीमानात बदल होतो. मात्र ज्याप्रमाणे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून हातात कुणाच्यातरी सांगण्यावरून हिरा, पन्ना आणि निलम अशा अंगठ्या घातल्या. तरीही त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागलेच. मात्र माझे तसे नाही, मी आज संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या शहरातील बैठका घेतोय ती शहरे पाहतोय ते केवळ तुम्ही मला तुमच्या खांद्यावर घेतले आहे म्हणून शक्य आहे. त्याची मला जाणीव आहे ,अनेक आमदार येतात आणि जातात पण या जिल्ह्याच्या जनतेने सलग 35 वर्ष मला राजकारणात विजयी ठेवले. त्यामुळे मी आज केंद्रात मंत्री आहे, अन्यथा मी माझ्या माझ्या गावातल्या मारोतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो, असे वास्तव दानवे यांनी यावेळी जनतेपुढे कबूल केले.

माझा हनिमून आधीच झालाय, त्यामुळे मला शपथ घेण्याची गरज पडली नाही- दानवे

भागवत कराड मंत्रीमंडळात नुकतीच वर्णी लागली आहे. त्याच्या विषयी बोलताना दानवे म्हणाले, भागवत कराड नवीन चेहरा असल्याने त्यांच्या मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालो आहे. त्यामुळे माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नसल्याचे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्याने सभास्थळी हशा पिकल्याचे चित्र पाहायला मिळाले. मला कोळसा खातं मिळाल्याने सकाळीच उठून मी तोंडावरून हात फिरवून पाहिला. तोंड काळं तर झालं नाही ना? गालावरून हात फिरवून पाहायचो.. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नाही त्यामुळे तोंड काळ व्हायचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी यावेळी जनतेला ठासून सांगितले.

माझं मंत्रीपद जाण्याच्या बातम्या आल्यानं अनेकांना गुदगुल्या झाल्या -

केंद्र सरकाराच्या मंत्रीमंडळ विस्तार काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यावेळी माधम्यांवर रावसाहेब दानवे यांचेही मंत्रीपद गेल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर बोलताना दानवे यांनी विरोधकांना जोरदार चिमटे काढले. माझं मंत्रीपद जाणार असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्यानंतर अनेकांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोला दानवे यांनी विरोधकांना लगावला. मात्र लोकांनी सातत्याने ३५ वर्ष निवडून दिले. २०१९ च्या निवडणुकीत मी साडेतीन लाख मतांनी निवडून आलो, त्या निकालाच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र घेण्याआधी बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्याला कसे चिमटे काढले याचा किस्सा सांगितला तसेच आयुष्यात अशा कहाण्या खूप झाल्यात असं सांगत भाजप नेते बबनराव लोणीकर आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टोलेबाजी करत त्यांचा समाचार घेतला.

Last Updated : Aug 20, 2021, 9:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details