महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

या निवडणुकीसाठी तालुक्यात १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे. त्यात एकूण ३ हजार ९०५ मतदार असून पुरुष मतदार ३ हजार ३२७ तर महिला मतदार ५७८ आहे.

जालना
जालना

By

Published : Dec 1, 2020, 4:12 PM IST

Updated : Dec 1, 2020, 4:57 PM IST

जालना - मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भोकरदन तालुक्यातील १६ मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. वयोवृध्दांनीही मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी तालुक्यात १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे. त्यात एकूण ३ हजार ९०५ मतदार असून पुरुष मतदार ३ हजार ३२७ तर महिला मतदार ५७८ आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन शहरातील नवीन भोकरदन भागात असलेल्या बूथ क्रमांक १९६ मतदान केंद्रावर दानवे यांनी आपल्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार संतोष दानवे व निर्मला रावसाहेब दानवे यांनीही सुरक्षित अंतराचे पालन करून मास्कचा वापर करत रांगेत उभे राहून मतदान केले.

जालना

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मतदान केंद्राला भेट

शहरातील मतदान केंद्रावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी सभापती लक्ष्मण दळवी, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, वयोवृध्द सेवानिवृत्त आदर्श शिक्षक नारायण पैठणकर (वय ८१) यांनी पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वच मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Last Updated : Dec 1, 2020, 4:57 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details