महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - नगराध्यक्ष मंजुषा देशमुख

प्रजासत्ताक दिनानिमित्त भोकरदन तालुक्यातील अनेक शाळांनी गावातून शोभा यात्रा काढल्या. तर काही शाळा, महाविद्यालयांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jan 27, 2020, 12:59 PM IST

Updated : Jan 27, 2020, 1:25 PM IST

जालना- प्रजासत्ताक दिनी भोकरदन नगर परिषद येथे नगराध्यक्ष मंजुषा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अमिटकुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपनागराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांच्यासह नगर परिषदचे नगर सेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भोकरदन येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

तसेच भोकरदन पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गोरड यांच्या हस्ते तर पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागसह विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयात त्या-त्या विभागाच्या प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध शाळा महाविद्यालयातही ध्वजारोहण कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा - जालन्यात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ

उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार गोरड, माजी आमदार संतोष दसपुते, राजाभाऊ देशमुख यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण, महिलांना धमकावण्याचा प्रयत्न

Last Updated : Jan 27, 2020, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details