महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल मीडियावर पत्रकारांविरोधात मानहानीकारक पोस्ट; युवासेनेच्या तालुकाप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल - journalist

युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर दत्तात्रय बोराडे याने सोशल मीडियावर स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून पत्रकारांची बदनामी करणारी पोस्ट टाकली आहे.

मंठा पोलीस ठाणे

By

Published : May 20, 2019, 11:56 PM IST

जालना- मंठा येथील युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर दत्तात्रय बोराडे याने सोशल मीडियावर स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून पत्रकारांची बदनामी करणारी पोस्ट टाकली आहे. या प्रकरणी पत्रकार संतोष दायमा यांनी मंठा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी २९४, ५००, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक कमेंट

मंठा येथील युवा सेनेचा पदाधिकारी डिगांबर बोराडे याने आज (सोमवार) स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरून पत्रकारांची बदनामी करून मानहानी व अब्रू नुकसान करणारी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये मंठा तालुक्यातील पत्रकार दलाल आहेत, ते स्वतःच्या फायद्यासाठी .....अशी अश्लील भाषा वापरली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत मंठा पोलीस ठाणे गाठत डिगांबर बोराडे विरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टवार तपास करत आहेत.

यावेळी नागेश कुलकर्णी, संतोष दायमा, कृष्णा भावसार, प्रदीप देशमुख, बाबासाहेब कुलकर्णी, बाबूजी तिवारी, पांडुरंग खराबे, रंजीत बोराडे, दिनेश जोशी, बालाजी कुलकर्णी, अनिल बा. खंदारे, विजयकुमार देशमुख, पंडित बोराडे, रमेश देशपांडे आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details