जालना- पवित्र मानल्या जाणाऱ्या आई, बाप, मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्याच्या परतूर शहरात घडली आहे. पित्यानेच स्वतःच्याच मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला माहित असतानाही तिने विरोध न करता पतीला साथ दिली. पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने तिने थेट आझाद मैदान गाठत उपोषण केले. अखेर मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत जालन्यात वर्ग केला.
परतूर येथील 16 वर्षीय मुलीवर 2018 मध्ये तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केला होता. ती तक्रार करेल म्हणून तिला एका पत्रकाराकडे नेऊन तिची समजून घालण्यात आली. तेव्हा या पत्रकाराने देखील लग्न करतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेने तिच्या आईला आणि दोन मावश्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी तिघींनीही तिला मदत न करता उलट या मुलीनेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ नये म्हणून तिला ६ महिने डांबून ठेवले होते.