जालना -आलं-लसूण विकणाऱ्या व्यापाराला मारहाण करत त्याच्याकडील दीड लाख रुपये पळविल्याची घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. समीर पी. शेख (वय 28 वर्षे, रा. दुखी नगर), असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, समीर शेख यांचा आलं-लसूण विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समीर हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच 21 बी एन 4936) वरुन दुखी नगर येथून बसस्थानकमार्गे ईदगाहकडे जात होते. ईदगाड जवळील पुलाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी समीर यांच्या पाठीत चाकू मारला. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला.