महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीमुळे बससेवा झाली बंद; विद्यार्थ्यांना पायपीट करत गाठावी लागते शाळा

बदनापूर तालुक्यातील धामणगाव ते राजूर फाटा या रस्त्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मागील एका वर्षापासून या रस्त्याचे काम सुरूच आहे. या कामासाठी रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली आहे.  टोकदार खडीमुळे वाहने तर सोडाच पण पायी चालणेही कठीण झाले आहे.

jalna
रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीमुळे बससेवा झाली बंद; विद्यार्थ्यांना पायपीट करत गाठावी लागते शाळा

By

Published : Jan 12, 2020, 9:40 AM IST

जालना - रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करून ठेकेदाराने रस्त्यावर खडी अंथरूण ठेवल्यामुळे तालुक्यातील धामणगाव येथे जाणारी बस महामंडळाने बंद केली आहे. या रस्ताचे काम गेल्या एका वर्षापासून रखडलेले आहे. त्यामुळे या गावातील 70 ते 80 विद्यार्थ्यांना 8 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे. आपल्या गावात पुन्हा बस यावी म्हणून या विद्यार्थ्यांनी शाळा बुडवून रस्त्यावर टाकलेली खडी काढली. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याचे दिसत आहे.

रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीमुळे बससेवा झाली बंद; विद्यार्थ्यांना पायपीट करत गाठावी लागते शाळा

हेही वाचा -जालन्यात व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या

बदनापूर तालुक्यातील धामणगाव ते राजूर फाटा या रस्त्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मागील एका वर्षापासून या रस्त्याचे काम सुरूच आहे. या कामासाठी रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली आहे. टोकदार खडीमुळे वाहने तर सोडाच पण पायी चालणेही कठीण झाले आहे. या खडी अंथरलेल्या रस्तयवरून अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. या गावात 70 ते 80 विद्यार्थी विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेतात. परंतु रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे एस. टी. महामंडळाने नियमित चालणारी बस आणि विद्यार्थींनीसाठी सुरू असलेली मानव विकास योजनेतंर्गतची बस बंद केल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

हेही वाचा -झटपट लग्न करणे पडले महागात; बायकोने लावला तीस हजाराला चुना!

रस्त्यात टाकलेल्या टोकदार खडीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पायांना इजाही होत आहेत. सुमारे 1 ते दीड तास पायपीटीमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस कमी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा रस्ता मागील वर्षांपासून सुरू आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून या रस्त्यावर खडी पसरवून ठेवल्यामुळे आणि बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचेही हाल होत आहे. ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला आणि प्रशासनाला हा रस्ता त्वरीत तयार करून देण्याची मागणी केली आहे. तरीही प्रशासन याकडे कानडोळा करत आहे.

हेही वाचा -पाहा...पानीपत युद्धावेळी कसा होता मावळ्यांचा युद्धसराव

विद्यार्थ्यांनी या मार्गावर पुन्हा बस सुरू व्हावी म्हणून एकत्रित येत बसची चाके जातील एवढया भागातील खडी बाजूला सारून अनोखे अंदोलन केले. प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला त्वरीत कामे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या बाबत धामणगावच्या सरपंच मोनिका साळवे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक करत रस्त्याचे काम रेंगाळल्याबददल संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात या कामाला सुरूवात न झाल्यास विद्यार्थ्यांसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details