जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी डिसेंबरमध्ये झालेल्या एका घरफोडीचा तपास सुरू केला होता. या घरफोडीचा तपास करत असताना दुसऱ्या एका ठिकाणाहून चोरीला गेलेली मोटरसायकल देखील या तपासात सापडली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख खांडवी आणि केंधलीयेथे चोरी-
मंठा तालुक्यातील मौजे केंधळी आणि परतूर तालुक्यातील खांडवी येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. या शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी आरोपींची तपासणी सुरू केली. त्यानुसार परतूर येथे पारधी वाड्यात राहणाऱ्या उत्तम भीमा गायकवाड याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या सहकाऱ्यांसह चोरी केल्याचे कबूल केले आहे.
दोन ठिकाणी केल्या चोर्या-
मंठा तालुक्यात असलेल्या केंधली गावच्या दिनकर जोशी यांच्या राहत्या घरी आणि परतूर तालुक्यातील मौजे राणी वाहेगाव येथील एक मोटर सायकलची चोरी केली होती. हीच मोटरसायकल चोरीसाठी वापरण्यात आली.
तीन लाख 33 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल जप्त-
परतूर आणि खांडवी येथे केलेल्या घरफोड्यामध्ये सोन्या चांदीचे किमती दागिने ज्यांची किंमत तीन लाख 23 हजार 455 रुपये आहे. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली चोरीच मोटरसायकलची किंमत दहा हजार रुपये आहे. असा एकूण तीन लाख 33 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, किशोर एडके, प्रशांत देशमुख, कृष्णा तगे, सागर बाविस्कर, विलास चेके, रवी जाधव महिला पोलीस मंदा बनसोडे यांनी केली.
हेही वाचा-आता ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज