जालना - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दळणवळण बंद झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून कुरीअरद्वारे रक्तपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जनकल्याण रक्तपेढीचे संचालक पुसाराम मुंदडा यांनी सांगितले.
संचारबंदीमुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली असली, तरी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्ताचे सर्व प्रकार या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता रक्तपेढीमध्ये संपर्क साधल्यास त्यांना संबंधित हॉस्पिटलमध्ये हवे असलेले रक्त उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी जनकल्याण रक्तपेढी २४ तास उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.