महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात दृष्टीहीन शिक्षकांचे रक्तदान - jalna todays top news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आजारातून बरे झालेले रुग्ण आणि ज्यांनी लस घेतली आहे असे नागरिक या दोघांनीही किमान महिनाभर रक्तदान करू नये अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा ही भासू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आणि रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले आहे. यावेळी दोन अंध शिक्षकांनी देखील रक्तदान केले.

jalna latest news
जालन्यात दृष्टीहीन शिक्षकांचे रक्तदान

By

Published : May 14, 2021, 12:26 PM IST

जालना - येथे सदर बाजार पोलीस आणि ज्योती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालयाच्या दोन अंध शिक्षकांनी देखील रक्तदान केले.

जालन्यात दृष्टीहीन शिक्षकांचे रक्तदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आजारातून बरे झालेले रुग्ण आणि ज्यांनी लस घेतली आहे. असे नागरिक या दोघांनीही किमान महिनाभर रक्तदान करू नये अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. कोरोना परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा ही भासू नये म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होतो.

109 रक्तदात्यांचे रक्तदान -

1 मे रोजी पहिले रक्तदान शिबिर कदीम जालना पोलिस ठाण्यात पार पडल्यानंतर दुसरे शिबीर सदर बाजार पोलिस ठाण्यात पार पडले. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. या रक्तदात्यांचा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपाधिक्षक सुधीर खिरडकर, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, संजय व्यास, देविदास शेळके, यशवंत जाधव हे पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. एकूण 109 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.

हेही वाचा - 'म्यूकरमायकोसिस गंभीर आजार; वेळीच उपचार करा, अन्यथा...'

ABOUT THE AUTHOR

...view details