जालना- पावसाळा सुरू होऊन खरीप हंगामातील पेरणीही संपत आली आहे. तरीही राज्यातील महाआघाडीच्या सरकारने पीक कर्ज माफीची अंमलबजावणी केलेली नाही. ती त्वरित करावी व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी भोकरदन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर भाजप आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.