महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्लेखनीय..! वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाचनालयास पुस्तके भेट - पुस्तके

आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण, भोकरदन येथील सुवर्णा सोळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटुन तसेच केदारखेडा येथील श्री.केदारेश्वर सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला आहे.

पुस्तके भेट देताना

By

Published : Oct 13, 2019, 1:18 PM IST

जालना- आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रूपये खर्च करतात. पण, भोकरदन येथील सुवर्णा सोळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटुन तसेच केदारखेडा येथील श्री.केदारेश्वर सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला आहे.

यंदा हॉल, मंडप, डेकोरेशन यावर अवाढव्य खर्च करतर वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहे. तरी देखील समाजासाठी आपण काही देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत भोकरदन येथील तुळजाभवानी नगर भागातील सुवर्ण सोळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व केदारखेडा येथील श्री.केदारेश्वर सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

सोळुंके दाम्पत्य भोकरदन येथे वास्तव्यास असून ते केदारखेडा येथील एका इंग्रजी माध्यम शाळेत कार्यरत आहेत. ज्या परिसरात आपण काम करतो त्यांचे ऋण व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या सोळुंके दाम्पत्यांनी वाढदिवसा निमित्त कसलाही गाजावाजा न करता श्री.केदारेश्वर सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट दिले व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. सोळुंके दाम्पत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात नविन पायंडा पाडला असून या सामाजिक उपक्रमाबद्दल सोळुंके परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - जालन्यात गॅस टँकर उलटल्याने चार तास वाहतूक खोळंबली

सोळुंके दाम्पत्याचा सामाजिक कार्यात नेहमी असतो सहभाग
सुवर्णा सोळुंके या केदारखेडा येथील एका इंग्रजी माध्यम शाळेत उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचे पती गणेश सोळुंके हे याच शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. हे दाम्पत्य नेहमी नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. जसे की, त्यांनी नुकतेच आपल्या शाळेमध्ये शाडू मातीच्या गणपतीची स्थापना केली होती. जलप्रदूषण टाळण्यासाठी त्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीमध्ये, विहिरीमध्ये न करता एका कुंडीमध्ये करून त्यात फुलाचे रोप लावले होते. दिवाळी साजरी करतांना सुद्धा ते फटाके मुक्त दिवाळी साजरी करत असतात. गगणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, नवरात्रोत्सव आदी सण साजरे करतांना ते डी.जे.संस्कृतीला फाटा देत लेझीम पथक, ढोल पथकाचे आयोजन करत असतात. विशेष म्हणजे त्यांचे लग्न सुद्धा जास्त खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने कुंकू टिळ्यामध्येच संपन्न झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details