जालना(भोकरदन) - सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करून संचार बंदी लागू करण्यात करण्यात आली आहे. या दरम्यान सर्व सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काही कार्यक्रम घरातच साजरे करण्यात येत आहे.
सोशल डिस्टन्स ठेवत साजरी झाली महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती - सोशल डिस्टन्स
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करून संचार बंदी लागू करण्यात करण्यात आली आहे. या दरम्यान सर्व सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भोकरदन शहरातील रमाई नगर येथे आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीदेखील सोशल डिस्टन्स ठेवत साजरी करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले
आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीदेखील सोशल डिस्टन्स ठेवत साजरी करण्यात आली. भोकरदन शहरातील रमाई नगर येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रदिप जोगदंडे, सचिव तथा नगरसेवक दिपक बोर्डे, विशाल मिसाळ, स्वप्नील दाभाडे यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते.