जालना - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष परिश्रम घेतले आहे. मात्र, भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास हे कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतदेखील कार्यालयात तसेच मुख्यालयात नियमबाह्य गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (मंगळवार) त्यांच्या विरुद्ध तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास तडकाफडकी निलंबित - नायब तहसीलदार गणेश पोलास तडकाफडकी निलंबित
भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास हे कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतदेखील कार्यालयात तसेच मुख्यालयात नियमबाह्य गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज (मंगळवार) त्यांच्या विरुद्ध तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
![भोकरदनचे नायब तहसीलदार गणेश पोलास तडकाफडकी निलंबित भोकरदन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7074879-610-7074879-1588692318482.jpg)
भोकरदन
पोलास हे दि. 24 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत केवळ एक दिवस कार्यालयात हजर राहिलेत. नियमबाह्य गैरहजर राहणे, मुख्यालयात वास्तव्यास न राहणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे, इत्यादी कारणांनी ठपका ठेऊन पोलास यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.