महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरदन पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई, २ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त - gambling den Bhokardan

कारवाईत एकूण सात आरोपींनी जुगारावर लावलेली रोख रक्कम १७ हजार ७०० रुपये व ६ दुचाकी, असा एकूण २ लाख ७७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Oct 22, 2020, 3:33 PM IST

जालना- भोकरदन शहरालगत असलेल्या एका जुगार अड्ड्यावर भोकरदन पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी रोख रक्कम १७ हजार ७०० रुपये व ६ दुचाकी असा एकूण २ लाख ७७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करण्यात आली. या प्रकरणी पो.उप.नि पंकज मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी रुस्तुम जैवाळ करीत आहे. दरम्यान, यापुढे अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रभारी पोलीस अधिकारी फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

हेही वाचा-जालना: अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांची कारवाई; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details