जालना-बुलडाणा जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात लोक दारु घेऊन येत असल्याचे माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली होती. भोकरदन तालुक्यातील रेलगाव चौफुलीवर विविध ठिकाणी छापे मारून ३ लाख ६० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १६ मोटारसायकल आणि २४६६० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातून दारु आणणाऱ्या २५ जणांवर भोकरदन पोलिसांची कारवाई; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त - जालन्यातील दारु दुकाने बंद
जालना जिल्ह्यातील तळीराम देशी दारू आणण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. दारू घेऊन परतत असताना २५ जणांवर भोकरदन पोलिसांची कारवाई केली. देशीदारुच्या बाटल्या आणि १६ दुचाकी असा ३ लाख ६० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल भोकरदन पोलिसांनी जप्त केला.
![बुलडाणा जिल्ह्यातून दारु आणणाऱ्या २५ जणांवर भोकरदन पोलिसांची कारवाई; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त bhokardan police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7136832-111-7136832-1589091457580.jpg)
बुलडाणा जिल्ह्यातून दारू घेऊन येणाऱ्या 25 जणांवर अवैधरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि भिकुलाल वडदे, पोलीस नाईक रुस्तुम जैवाळ, पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, अभिजीत वायकोस, समाधान जगताप, अनिल जोशी, चालक उदय सिरसाठ यांनी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास भोकरदन पोलीस करत आहेत.
दरम्यान,कोरोना विषाणूमुळे जगभरात थैमान घातले असून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी दारुची दुकाने सुरू आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. यामुळे ज्या ठिकाणी दारूची दुकाने बंद असल्यामुळे दारू पिणाऱ्यांची तारांबळ होत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात दारुची दुकाने सुरू आहेत त्या जिल्ह्यात लोक दारु आणण्यासाठी त्या जात असल्याचे चित्र आहे.