महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसानीची मदत वर्ग करू - कृषी मंत्री दादा भुसे - etv bharat maharshtra

दोन दिवसानंतर 3 हजार 600 कोटी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे 350 कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

Dada bhuse
Dada bhuse

By

Published : Oct 26, 2021, 8:37 PM IST

जालना : दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पावसामुळे झालेली नुकसानभरपाई जमा करणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

अतिवृष्टी नुकसानीची मदत वर्ग करू

या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेतला. जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे 350 कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती भुसे यांनी दिली. त्याचप्रमाणे दोन दिवसानंतर 3 हजार 600 कोटी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.जसे जसे पंचनाम्यांचे कागदपत्रे राज्य सरकारकडे येतील तशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करणार असल्याचं देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय.

10,000 हजार कोटी रुपयांचे पॅकेज

गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी तसेच गारपीट अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे लांखोंचे नुकसान झाले आहे. आम्ही मंत्रीमंडळात 10,000 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे जाहीर केलेले आहे. जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. तसेच ज्यांचे पंचनामे सरकारकडे आहेत. अशांना मदत देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
हेही वाचा -आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक

ABOUT THE AUTHOR

...view details