महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप-शिवसेना आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे सरकार - बाळासाहेब थोरात - माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जालना जिल्ह्यात आले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने थोरात यांच्या सत्काराचे आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 5, 2019, 8:25 PM IST

जालना- भाजप-शिवसेना युतीचे सरकार म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे सरकार आहे. धरणे आम्ही बांधली आणि पूजा हे करीत आहेत. तरीही आम्हालाच नावे ठेवतात. गेल्या 5 वर्षांत युती सरकारने कोणतेही काम केले नाही, आम्ही केलेल्या कामांवरच हे आयते येऊन बसले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जालना जिल्ह्यात आले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने थोरात यांच्या सत्काराचे आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप सरकार राज्यघटनेलाही धक्का पोहोचवत आहे. यांनी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेत आत्तापर्यंत फक्त 30 टक्केच कर्ज वाटप केले आहे. तर, शिवसेनेने पीक विमा संदर्भात मुंबईमध्ये काढलेला मोर्चा दुसऱ्याच विमा कंपनीच्या कार्यालयावर नेऊन हसे करून घेतले आहे. या दोन्ही ही सत्ताधाऱ्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेने विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहनही थोरात यांनी केले.

मेगाभरतीच्या नावावर राजकीय भरती - अशोक चव्हाण

भाजपचे मेगाभरतीच्या नावावर राजकीय भरती सुरू आहे. पैशाच्या जोरावर माणसे फोडण्याचा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. तसेही काँग्रेसमधील सूज आलेलेच पदाधिकारी भाजपमध्ये जात आहेत. ही मंडळी भाजपला मानणारी नाही, जिकडे सरकार आले तिकडे पळणारी आहे. त्यामुळे उद्या परत काँग्रेसची सत्ता आल्यावर हे पुन्हा हा काँग्रेसकडे येतीलच. मात्र, त्यावेळी यांना घ्यायचे किंवा नाही, याचा विचार करावा लागेल, असे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, जे लोक भाजपसोबत येण्यास नकार देतात. त्यांच्यामागे भाजप चौकशीचा ससेमिरा लावत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

यावेळी माजी खासदार अशोक चव्हाण, जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार कैलास गोरंट्याल, राजेंद्र राख, प्राध्यापक सत्संग मुंडे, भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, विमल आगलावे, आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details