जालना -केंद्र शासनाने काश्मीरसाठीचे कलम 370 आज रद्द केले आहे. यावर बोलताना, सरकारने कसल्याही प्रकारचा विचारविनिमय न करता हुकूमशाही पद्धतीने घेतलेला हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते सोमवारी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच जालन्यात आले होते.
जनतेच्या भावना लक्षात न घेता हुकूमशाही पद्धतीने घेतलेला निर्णय - थोरात
काश्मीरसाठीचे कलम 370 आज केंद्र शासनाने रद्द केले आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, सरकारने कसल्याही प्रकारचा विचारविनिमय न करता घेतलेला निर्णय आहे. जनतेच्या भावना लक्षात न घेता हुकूमशाही पद्धतीने घेतलेला निर्णय आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरात हे पहिल्यांदाच जालन्यात आले होते. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.