महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी झोडपले - bajrang dal agitation against waris pathan in jalna

वारिस पठाण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालना शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले.

बजरंग दलचे कार्यकर्ते
बजरंग दलचे कार्यकर्ते

By

Published : Feb 23, 2020, 8:09 PM IST

जालना- एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालना शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी झोडपले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये जमा होत आज सायंकाळी 5 वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी विविध घोषणा दिली.

जोडे मारताना बजरंग दलचे कार्यकर्ते

यावेळी बजरंग दलचे शहर संयोजक अर्जुन डहाळे, आकाश सोनवणे, बालाजी नलमेल, ऋतुराज कदम, गौरव देशमाने, अमित आर्य, वेदांत खैरे, बालाजी पाटील, अक्षय तिपरास, शैलेस माधवाले आदी उपस्थित होते.

हेही वाचा -नोकरच निघाला चोर, जालन्यात चौघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details