जालना -भोजनालयाच्या माध्यमातून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेली 14 हजाराची देशी-विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. भोजनालयाचा मालक दिलीप श्रीरामवार (वय 45, रा. बडी सडक जालना) हा एका दारू व्यापाऱ्यांशी संगनमत करून ही दारू विकण्याचा व्यवसाय करत होता.
भोजनालयातून अवैध दारू विक्रीचा प्रयत्न फसला, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त - दारू जालना
भोजनालयाच्या माध्यमातून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेली 14 हजाराची देशी-विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे
![भोजनालयातून अवैध दारू विक्रीचा प्रयत्न फसला, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त bajar police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6545431-801-6545431-1585193363522.jpg)
भोजनालयातून अवैध दारू विक्रीचा प्रयत्न फसला
यासंदर्भात बाजार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक योगेश चव्हाण, समाधान तेलंग्रे, बंटी ओहोळ, फुसे , फुलचंद गव्हाणे, ज्योती राठोड आदींनी ही कारवाई केली आहे.