जालना - कोरोनाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व यंत्रणा आपापल्यापरीने पद्धतीने जनजागृती करत आहेत. मात्र तरीदेखील नागरिकांमध्ये पाहिजे तेवढी जनजागृती झाली नाही. त्यामुळे आता स्वतः यमराज रस्त्यावर उतरून कोरोनापासुन बचाव करण्याच्या उपाययोजनेची जनजागृती करत आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
मोफत मास्कचे करणार वाटप
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती 2021 आणि ब्राह्मण समाजाच्यावतीने गुरुवारी ही जनजागृती मोहीम हाती घेतली होती. जालना शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन पुढील तीन दिवसांमध्ये कोरोनापासून बचाव करण्याची जनजागृती केली जाणार आहे. आतापर्यंत सरकारी यंत्रणा, स्वायत्त संस्था, विविध सेवाभावी संस्था यांच्यावतीने कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी अजून त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी स्वतः यमराज रस्त्यावर फिरत आहे. गल्लीबोळातून हा यमराज फिरणार आहे आणि मास्कविषयी जनजागृती करणार आहे. फक्त जनजागृतीच नव्हे तर ज्याच्या तोंडाला मास्क नाही त्याला मोफत मास्क देखील स्वतः यमराज देणार आहे. यापुढे जाऊन नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही तर यमराजापासून त्याला कोणीही वाचवणार नाही, असा संदेश या माध्यमातून देण्याचा या जयंती उत्सव समितीचा प्रयत्न आहे. या यमराजासोबतच कोरोनापासून बचाव करण्याचे उपाययोजना सांगणारी ऑडिओ क्लिप देखील फिरत आहे.
नवीन जालना भागातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची सुरुवात झाली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याहस्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती 2019 चे अध्यक्ष संतोष दाणी यांनी पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी सिद्धिविनायक मुळे, सुरेंद्र न्यायाधीश, जगदीश गौड, डॉक्टर संजय रुईखेडकर, मुकुंद कुलकर्णी, रवींद्र देशपांडे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा -'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक