जालना -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रवासी वाहतूक बंद आहे. अशा परस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांची काही रिक्षा चालक लूट करत आहेत. अत्यावश्यक वाहतुकीसाठी आरोग्य विभागाने परवाना दिला असल्याचे हे रिक्षा चालक सांगत असून रिक्षाच्या काचेवर चिकटवलेला बोगस परवानाही दाखवत आहेत.
बोगस परवाना दाखवून ऑटो रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट; जालन्यातील प्रकार - जालना जिल्हा सामान्य रुग्णालय
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांची घरी जाण्या अगोदर आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येत असलेले परराज्यातील कामगार हे मुलाबाळांसह आणि सामानासह येत आहेत. त्यामुळे रुग्णालयातून वाहनापर्यंत जाण्यासाठी त्यांना ऑटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत हे चालक या प्रवाशांकडून जास्त पैसे घेत आहेत.

सामान्य रुग्णालयापासून औरंगाबाद रस्त्यावरील विशाल कॉर्नर, मंठा रोडवरील मंठा चौफुली, अंबड रोडवरील लक्ष्मीकांत नगरपर्यंत दोनशे ते अडीचशे रुपये भाडे रिक्षा चालक आकारत आहेत. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या या प्रवाशांना रिक्षाचालक आणखी त्रस्त करत आहेत. वास्तविक पाहता लॉकडाऊन सुरू असल्याने अद्यापही प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. असे असले तरी प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने पोलीसदेखील याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करत आहेत. मात्र, ऑटो रिक्षाचालक याचा गैरफायदा घेत आहेत.