जालना - औरंगाबाद विभाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज (गुरूवार) जालना जिल्ह्याचा आरोग्यविषयक आढावा घेतला. जालन्यात आल्याबरोबर त्यांनी सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या विविध कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकरांची जालन्याला भेट, आरोग्यविषयक कामाचा घेतला आढावा - औरंगाबाद न्यूज
औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज (गुरूवार) जालना जिल्ह्याचा आरोग्यविषयक आढावा घेतला.
![औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकरांची जालन्याला भेट, आरोग्यविषयक कामाचा घेतला आढावा Aurangabad Division Commissioner Sunil Kendrakar visits Jalna district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7671915-227-7671915-1592487222185.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जालना जिल्ह्याला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कुलकर्णी, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कोवीड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जगताप उपस्थित होते. यांच्याकडून केंद्रेकर यांनी माहिती घेतली. विशेषकरून जालना शहरात कोवीडच्या आजाराची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचीही त्यांनी आवर्जून पाहणी केली.