जालना -बदनापूर पोलिसांनी जादुटोणा करून गुप्तधन काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून, 3 जण फरार झाले आहेत. बदनापूर शहरातील एका वाड्यात हा गुप्तधन काढण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन 3 जणांना अटक केली.
जालन्यातील बदनापूर येथे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न फसला, 3 अटकेत - गुप्तधन काढण्याचा प्रयत्न बदनापूर
बदनापूर पोलिसांनी जादुटोणा करून गुप्तधन काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून, 3 जण फरार झाले आहेत.
![जालन्यातील बदनापूर येथे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न फसला, 3 अटकेत Pit](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13863110-thumbnail-3x2-op.jpg)
बदनापूरमधील कुंभार गल्लीतील पडीत वाड्यामध्ये आरोपींनी जादूटोणा करून गुप्तधन काढण्याचा प्रकार सुरू केला होता. गुप्तधन काढण्यासाठी मंत्रोच्चार करून खड्डा खोदला जात होता. हे गुप्तधन काढत असताना घटनास्थळी पोलिसांना पितळी तांब्या, 4 नारळ, कुंकू लावलेले लिंबू, एक लालसर रंगाचा कापड, खड्डा खोदण्यासाठी लोखंडी टिकास, पावडे, असे साहित्य आढळून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तर तिघांना अटक केली असून तिघेजण फरार झाले आहेत.
फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच, जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
हेही वाचा -माजी आमदाराच्या मुलीच्या वाहनाने चौघांना उडवले, जालना जिल्ह्यातील घटना